मुंबई, दि. १ : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे माजी दिवंगत सदस्य माधव गोविंद वैद्य व अनंत वामन तरे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला व श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.
००००