मुंबई, दि. १ : दिवंगत माजी विधानसभा सदस्यांना आज शोकप्रस्तावाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, माजी सदस्य सुर्यकांत महाडीक, आबाजी पाटील, संपतराव जेधे, रणजित भानु, निळकंटराव शिंदे, दौलतराव पवार, हरिभाऊ महाजन यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्री.झिरवाळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
000
अजय जाधव/विसंअ/01/03/2021