मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘नवउद्योजकांना प्रोत्साहन’ या विषयावर उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून गुरूवार, दि. ०४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
उद्योग संचालनालयाकडून नवउद्योजकांना देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा, कार्नेल युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क यांच्यासोबतचा सामंजस्य करार, आतंरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इनक्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य, राज्यात या उपक्रमाची करण्यात येणारी अंमलबजावणी, योजनेसाठीची आर्थिक तरतूद आदी संदर्भातील माहिती डॉ.हर्षदीप कांबळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
0000