मुंबई, दि. 3 : जळगाव येथील महिला वसतीगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याकरिता चार महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीसाठी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे व प्रसाद लाड यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्री बोलत होते.
000