मी शरद नामदेव पवार. लावंघर, ता. सातारा या दुर्गम भागातील शेतकरी. अतिवृष्टीनं झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळं मोठं संकट कोसळलं. शेतातील उभ्या पिकांचं खूप नुकसान झालं. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्याच्या आधारे तहसिलदारांमार्फत बाधित नागरिकांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्यात आला.
या अतिवृष्टीमुळं माझ्या अडीच एकरावरील खरीप हंगामात लावलेल्या भात व सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. या नुकसानीची भरपाई शासनानं केली, माझ्या बँक खात्यावर शासनाने 6 हजार रुपये जमा केले. या पैशांचा उपयोग मला बियाणे व खते घेण्यासाठी झाला. अशा कठीण प्रसंगात शासनाकडून मिळालेली मदत फार उपयुक्त ठरली. या संकटातून सावरण्याचे प्रयत्न करत असतानाच शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली आणि शेतीच्या कामांसाठी याचा मला उपयोग झाला. शासनाकडून अतिवृष्टीचे व पूरपरिस्थितीने बाधित नागरिकांच्या खात्यावर निधी जमा करुन शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.