मुंबई, दि. 16 : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या मंत्रालयीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह सहकार आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन आणि संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्री म्हणून आता राज्यमंत्री श्री.बनसोडे मंत्रालयीन कार्यालयातून बैठक घेतील.
००००