Monday, March 27, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कोविड रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा आढावा

Team DGIPR by Team DGIPR
March 17, 2021
in जिल्हा वार्ता, नागपूर
Reading Time: 1 min read
0
कोविड रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

शासकीय व खासगी रुग्णालयांतील कोविड रुग्णांसाठी सुविधा

 

नागपूर दि. १७ : कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा तसेच ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, बेड, मनुष्यबळ आदी सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोविडसंदर्भात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयो, मेडिकल, दत्ता मेघे, एम्स, लता मंगेशकर आदी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे सर्व सदस्य तसेच महसूल, उद्योग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

नागपूर जिल्ह्यासह विभागात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स, विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेडची संख्या वाढवतानाच ऑक्सिजनसह बेड निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीमधून 127 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीमधून कोविड रुग्णांसाठी तात्काळ आवश्यक सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.

 

कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनसह आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे. विभागात तसेच जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे कोविड रुग्णही त्याच प्रमाणात वाढत असून, यापैकी ज्या रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनसह उपचाराची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी प्राधान्याने बेड उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.

 

खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडसंदर्भात माहिती जनतेला उपलब्ध होईल. तसेच ज्या रुग्णांना तात्काळ भरती करण्याची आवश्यकता नाही, अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेतर्फे गृहविलगीकरणाबद्दल मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. रुग्णांनी अनावश्यक रुग्णालयांमध्ये भरती न होता प्रशासनाच्या सूचनांनुसार आवश्यक औषधोपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे अतिरिक्त  ऑक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच ऑक्सिजन प्लँट आदिबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विविध विभागाचे अधिकारी व टास्क फोर्सचे अधिकारी यांनी भेट देऊन हे काम तात्काळ पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

 

कोविड रुग्णांसाठी आमदार निवास, पाचपावली तसेच वनामती येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत असून, यापैकी वनामती येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोविड सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहील, यादृष्टीने नियोजन करावे. तसेच रेमिडेसिवीर हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपलब्ध होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले आहे.

 

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविड केअर सेंटर तसेच मेयो व मेडिकल येथे अतिरिक्त आरोग्यसुविधा निर्माण करुन बेडसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण करुन रुग्णांसाठी अतिरिक्त बेड तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबतही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना सूचना दिल्यात.

 

कोविडसंदर्भात नागपूर महानगरपालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, कोविड रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषधपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा वाढविण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

Tags: कोविड
मागील बातमी

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रणालीच्या वैशिष्ट्यांचा आदर्श इतर विद्यापीठांनी घ्यावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

पुढील बातमी

चित्रपट चित्रीकरण स्थळांच्या यादीत खाजगी स्थळांचा समावेश करून अधिक संधी उपलब्ध करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

पुढील बातमी
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

चित्रपट चित्रीकरण स्थळांच्या यादीत खाजगी स्थळांचा समावेश करून अधिक संधी उपलब्ध करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 7,850
  • 12,243,448

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.