मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांची ‘निर्धार करू पाणी जपून वापरण्याचा’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून गुरुवार दि. 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
22 मार्च रोजी झालेल्या जागतिक जलदिनानिमित्त ही मुलाखत घेण्यात आली आहे. जलसंधारण विभागामार्फत जलसंवर्धनासाठी सुरू असलेली कामे, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, राज्यातील भैागोलिक स्थितीवर आधारित जलसंधारणाच्या कामांना देण्यात येत असलेले प्राधान्य, पाण्याच्या वापराबाबत सजगता यावी यासाठीच्या उपाययोजना, लघुसिंचन योजना व पाणलोट विकासाच्या कामासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, वृक्षलागवडीसाठी देण्यात येत असलेले प्रोत्साहन, भूगर्भातील जलपातळी वाढविण्यासाठी गेल्या वर्षभरात राबविण्यात येत असलेले उपक्रम आदी विषयांची माहिती श्री. नंदकुमार यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.