औरंगाबाद,दि.२५ (जिमाका) – शासन अनुदानीत शहरी सडक योजनतंर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधी च्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उदयोग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यधिकारी कार्यालयात आयोजीत महानगरपालिकेच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय,अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस.डी.पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह इतर सर्व प्रमुख यंत्रणाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, कोरोना संसर्गाबाबत जिल्ह्यात उत्तम पध्दतीने प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याची कामे चालू असली तरी विकास कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये याकरिता महानगरपालिका अंतर्गत सर्व विकास कामे विहित मुदतीत व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी असे पालकमंत्र्यानी यावेळी निर्देशित केले.
यावेळी मनपा आयुक्त श्री. पाण्डेय यांनी शासन अनुदानित शहरी सडक योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महानगरपालिकेच्या निधीतून सुरु असलेल्या रस्ते कामांची माहिती देताना म्हणाले की एमआयडीसी च्या निधीतून 60%कामे,तर एम.एस.आर.डी.सी तून 30%कामे, तर मनपा 40% रस्तयांची कामे पुर्ण झाली आहे तर विशेष बाब म्हणून मनपाच्या हिश्याचे 50.57 कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी शासन मूलभूत सोई सुविधातंर्गत अनुदान देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शहर अभियंता श्री.पानझडे यांनी शहरात 16 हजार स्ट्रेट लाईट बसवण्यात आले असून अजून 3 हजार स्ट्रेट लाईट बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.जलकुंभाचे सर्वेक्षण करण्यात आले असून शहरात सहा विविध ठिकाणी जलकुंभाचे काम चालू करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तर घनकचरा व्यवस्थापन अधिकारी श्री.भोंबे यांनी माझी ‘वसुंधरा अभियान’ अंतर्गत खामनदीची स्वच्छता नदी किनारी वृक्षरोपण करण्यात आले असून 1 हजार झाडे लावण्यात आली असल्याची माहिती दिली.
क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उंची वाढविण्या संदर्भात, सफारी पार्क,नवीन पाणीपुरवठा योजना, संत एकनाथ महाराज नाटयगृहाचे काम, देवळाई या भागा करिता मलनि:सारण व्यवस्था, अमरप्रित चौक वाहतूक बेटामध्ये मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प,इत्यादी विकास कामाचा सविस्तर आढावा पालकमंत्री श्री.देसाई यांनी घेतला.