नवी दिल्ली, दि. २५ : राज्याचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे.पी डांगे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी पुष्पगुच्छ देवून श्री. डांगे यांचे स्वागत केले. परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती श्री कांबळे यांनी यावेळी दिली. दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांची कार्यालये तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयीही त्यांनी माहिती दिली.
परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत व प्रमाणीत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, यु ट्युब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप ग्रुप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री.कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी श्री.डांगे यांनी परिचय केंद्राच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.६३ /दिनांक २५.०३.२०२१