Monday, March 27, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

प्रभावी साहित्यातून अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र आणि जातिअंताची चळवळ मजबूत केली – डॉ.गिरीश मोरे

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला

Team DGIPR by Team DGIPR
April 24, 2021
in नवी दिल्ली, महाराष्ट्र परिचय केंद्र
Reading Time: 1 min read
0
प्रभावी साहित्यातून अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र आणि जातिअंताची चळवळ मजबूत केली – डॉ.गिरीश मोरे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नवी दिल्ली, २४ : संयुक्त महाराष्ट्र आणि  जातिअंताची चळवळ हा महाराष्ट्राच्या निर्मितीचा आरंभ असून या चळवळींमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा पोवाडा, ‘माझी मुंबई’ हे लोकनाट्य आदि साहित्य रचनांतून अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविली तसेच ‘फकिरा’, ‘एकजुटीचा नेता’ आदि साहित्य रचनांतून त्यांनी भारतातील जाती व्यवस्था संपून समता प्रस्थापित करण्याचे महत्त्वपूर्ण विचार प्रभावीपणे मांडले, अशी माहिती डॉ.गिरीश मोरे यांनी आज दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “संयुक्त महाराष्ट्र आणि जातिअंत चळवळीसाठी अण्णाभाऊ साठे यांचे योगदान” या विषयावर ३५वे पुष्प गुंफताना डॉ.मोरे  बोलत होते.

मराठी भाषिकांचा महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी लढत असलेल्या लोकांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अग्रणी होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी भाषिक लोकांमध्ये, कामगारांमध्ये, खेडोपाड्यातील जनतेत, राजकीय लोकांमध्ये नेली. भारतातील जाती व्यवस्था संपून समता प्रस्थापित करण्याचा विचारही त्यांनी प्रभावीपणे मांडला. त्यासाठी साहित्यकृतीत अठरापगडजातीची शूरवीर माणसं उभी केली, समतेचा पुरस्कार करणारे अनेक स्त्री-पुरुष त्यांनी साहित्यात चित्रीत केले असे डॉ.मोरे म्हणाले.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गतिमान केली

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गतिमान केली होती. १९४७ मध्ये त्यांनी ‘महाराष्ट्राची परंपरा’ हा पोवाडा रचला. या पोवाड्यातून त्यांनी महाराष्ट्र, मराठी भाषा बोलणारे लोक, संत-महंत याविषयी अभिमान व्यक्त केला तसेच ‘बा महाराष्ट्रा हो जागा झुगारूनी निद्रा, महाविदर्भ गोबा मराठवाडा सारा सांडुनी, देश हा ३ कोटींचा प्यारा ने पुढे  थोर परंपरा’ असे सांगून सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी तयार होण्याचे आवाहन केले होते.

‘महाराष्ट्रासाठी रक्ताचा सळा सांडू, खंडीत महाराष्ट्राचे तुकडे जोडू, मराठवाडा विदर्भाला एकत्र करू, अठरापगड जातींना एकत्र करू, निजामाविरूद्ध लढू पण ३ कोटींचा एक भाषिक महाराष्ट्र निर्माण करू’ असा निर्धार अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या रचनांमधून मांडल्याचे डॉ.मोरे म्हणाले.

मुंबईतील गिरणी कामगारांनी जीव धोक्यात घालून संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू ठेवला होता. त्यासाठी १९४९ मध्ये अण्णाभाऊंनी ‘मुंबईचा गिरणी कामगार’ हा पोवाडा लिहिला. ‘घे  आण  स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया’ असा विश्वास त्यांनी या पोवाड्याच्या माध्यमातून कामगारांमध्ये निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु होती तेव्हा मुंबई कोणाची हा वाद निर्माण झाला त्यावर त्यांनी ‘माझी मुंबई’ हे मुंबई कुणाची दाखवून देणारे लोकनाट्य लिहिले. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर बेळगाव, निपाणी, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर येथे या लोकनाट्याचे प्रयोग करून जनतेमध्ये जागरूकता केली. या लोकनाट्याने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकांच्या मनामध्ये रुजवली  व उतरवली होती, असे त्यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ‘माझी मैना गावावर राह्यली’ ही प्रसिद्ध छक्कड संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारित आहे. पती-पत्नीच्या रुपकातून मराठी प्रदेशावर असलेले अण्णाभाऊंचे प्रेम यातून व्यक्त होते. ज्याप्रमाणे कामगाराची मैना गावाकडे राहिली आहे तशीच खंडीत महाराष्ट्राची अवस्था झाली आहे हे त्यांनी या ‘छक्कड’ मधून सांगितले आहे.

जातिअंताच्या चळवळीला साहित्यातून बळ

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी प्रमाणेच जातिअंतासाठीही अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या अनेक साहित्यकृतीतून जगबदलासाठी जातिअंताचे विचार मांडले. त्यासाठी पद्य रचना केली कथा, कादंबऱ्या लिहिल्या. सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे व समता प्रस्थापित व्हावी ही भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी आपल्या साहित्यातून जातिअंतांच्या, जातीय विषमतेच्या प्रश्नांची दखल घेतली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिअंताची चळवळ उभी करून कृतीशिल प्रयत्न केले तर या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी भरीव योगदान दिले, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

अण्णाभाऊ साठे यांची अत्यंत गाजलेली ‘फकिरा’ ही कादंबरी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीला अर्पण केली. अन्याया विरूद्ध लढणारा व जातीय ‍विषमतेला थारा न देणारा फकिरा हा नायक त्यांनी या कादंबरीत प्रभाविपणे उभा केला आहे. ‘देशभक्‍त घोटाळे’ या लोकनाट्यातील एका पात्राच्या तोंडी अण्णाभाऊ लिहितात ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भिमराव…’ .

‘उपकाराची परतफेड’ या कथेत मळू महार आणि शंकर चांभार यांच्या वर्तनातून जातिअंत झाला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. ‘सापळा’ या कथेतून जातिअंत झाला पाहिजे अशी मानसिकता विकसीत होते. त्यांच्या कथेतील ‘बडवद्या कंजारी’ हा जात पंचायतीचे जाचक दंड नाकारतो, हा नकार म्हणजे जातिअंताच्या चळवळीतील प्रातिनिधीक आवाज आहे, असे डॉ.मोरे म्हणाले.

अण्णाभाऊ साठे आपल्या एका रचनेत म्हणतात,‘ठरवून आम्हा हिन कलंकीत, जन्मोजन्मी करूनी अंकित, जिने लादून अवमानित निर्मुन, हा भेदभाव एकजुटीच्या इया रथावरती  आरुढ होऊनी, चालबा पुढती नव महाराष्ट्रा निर्मुन जगती करी प्रगट निजनाव’, ‘तू मराठमोडा’ या कवितेतही त्यांनी हाच विचार मांडला आहे .

‘त्या तुझ्या जुन्या खोपीत समतेचा पाळणा हाले, एकीनं वाढवून तिला कर खरे ब्रिद आपुले, उठ वाजवित रणभेरी घुमवी अंबरी वळू नको व पळू तू बदल ही दुनिया सारी’ असे विचार त्यांनी मांडले. ‘वैर’ कांदबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी महाष्ट्र राज्यात विषमता नष्ट झालेली आपण पहावी असा निश्चय मांडला असून त्यांचे हे विचार जातिअंतांच्या चळवळीला बळ देणारे आहेत असे डॉ.मोरे म्हणाले. ‘एकजुटीचा नेता’ या रचनेत जनतेमध्ये एकजूट निर्माण करून जातीच्या भिंती पाडून लोकशाहीची गाणी गाऊ असा प्रगल्भ विचार अण्णाभाऊ साठे यांनी मांडला आहे. डॉ.मोरे यांनी यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास व त्यातील विविध टप्प्यांवरही प्रकाश टाकला.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गतिमान करण्यात अण्णाभाऊंनी अपार कष्ट घेतले. तसेच, भारतातील जाती व्यवस्था संपून समता प्रस्थापित होण्यासाठी साहित्यकृतीतून त्यांनी प्रभावी विचार मांडले. त्यांनी केलेले हे अभूतपूर्व कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत मोलाचे आहे, असे डॉ.मोरे यावेळी  म्हणाले.

०००००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१२४/दिनांक २४.०४.२०२१

Tags: अण्णाभाऊ साठे
मागील बातमी

पुण्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढतेय, ही दिलासादायक बाब – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढील बातमी

डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयासारखी दुर्घटना पुढे घडणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी
डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयासारखी दुर्घटना पुढे घडणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयासारखी दुर्घटना पुढे घडणार नाही याची दक्षता घ्यावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 7,816
  • 12,243,414

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.