Monday, May 29, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

ऑक्सिजन वापराचे काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक नियोजन करावे! – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू आढावा बैठक

Team DGIPR by Team DGIPR
May 12, 2021
in जिल्हा वार्ता, धुळे
Reading Time: 1 min read
0
ऑक्सिजन वापराचे काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक नियोजन करावे! – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन वापराचे काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे नियोजन करावे. त्यासाठी ऑक्सिजन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. त्याबरोबरच कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर आतापासूनच भर द्यावा, असे निर्देश नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त श्री. गमे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली, तरी आरोग्य यंत्रणेने अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. आठवड्यातून किमान 25 हजार चाचण्या होतील, असे नियोजन करावे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील अतिजोखमीचे आणि संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करावी. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता आणखी एक हजाराने वाढवावी. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. या प्रयोगशाळेच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा. तसेच अहवाल तातडीने मिळतील, असेही नियोजन करावे.

कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या मृत्यूचे विश्लेषण करावे. त्यामागील कारणांचा शोध घ्यावा. रुग्ण व्यवस्थापन करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे औषधेपचार करावेत. खासगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित प्रत्येक रुग्णांच्या बिलाचे लेखापरीक्षण करावे. त्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज द्यावा. तसेच रुग्णालयांना वेळोवेळी भेटी देवून तपासणी करावी. कोरोनाबाधित रुग्णाला आवश्यकतेप्रमाणे कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड हेल्थ हॉस्पिटल्मध्ये दाखल करावे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी गृह विलगीकरण पध्दत बंद करावी, अशाही सूचना आयुक्त श्री. गमे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या दोन हजार 346 रुग्ण असून पॉझिटिव्हीटी दर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या दररोज किमान पाच हजार चाचण्या होतील, असे नियोजन करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी खासदार, आमदार, डीआरडीओ, सामाजिक दायीत्व निधीतून ऑक्सिजन प्रकल्प 30 जून 2021 पर्यंत कार्यान्वित होतील. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत आहे. जिल्हा रुग्णालयात महानगरपालिका, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने जम्बो कोविड बाह्य रुग्ण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे 24 तास रुग्णांची  तपासणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले, लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीसाठी मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख यांनी सांगितले, कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलांच्या तपासणीसाठी आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके नियमितपणे बिलांचे लेखापरीक्षण करीत आहेत, असेही सांगितले.

जिल्हा रुग्णालयास भेट, ऑक्सिजन प्रकल्पाच्या जागेची पाहणी

आयुक्त श्री. गमे यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देवून जम्बो कोविड ओपीडी आणि ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजित जागेची पाहणी केली. तसेच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर, पुणे यांच्याकडून धुळे जिल्ह्यास 50 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रटर उपलब्ध झाले. त्याचे वितरण आयुक्त श्री. गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव, अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक श्री. बच्छाव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भडांगे, डॉ. माणिक सांगळे, डॉ. अश्विनी भामरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते. याचवेळी आयुक्त श्री. गमे यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या धुळे शाखेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

000

Tags: ऑक्सिजन
मागील बातमी

कोविडसंदर्भातील अहवाल -‍ १२ मे २०२१

पुढील बातमी

लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

पुढील बातमी
लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,147
  • 12,626,753

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.