मुंबई, दि. 13 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्त्व दिले आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन करतो. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो व सर्वांना विशेषतः मुस्लिम भगिनी – बंधूंना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
000
Maharashtra Governor greets people on Eid-Ul-Fitr
Mumbai, 13 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people of Maharashtra on the occasion of Eid-Ul-Fitr (Ramzan Eid). In his message, the Governor has said: “The holy month of Ramzan attaches highest importance to fasting, prayers and charity. The threat posed by the Corona Virus Disease is far from over. I therefore appeal to the people to celebrate Eid staying at home and observing all government guidelines. May ‘Eid-Ul-Fitr’ bring happiness, good health and prosperity to all. Wishing ‘Eid Mubarak’ to all, especially to Muslim sisters and brothers.”
000