रायगड, दि.16 (जिमाका) : “तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 2 हजार 499 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
अलिबाग-339, पेण-0, मुरुड-894, पनवेल-20, उरण-140, कर्जत-0, खालापूर-0, माणगाव-7, रोहा-44, सुधागड-32, तळा-0, महाड-130, पोलादपूर-86, म्हसळा- 377, श्रीवर्धन-430
या एकूण 2 हजार 499 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
0000000