मुंबई ,दि.17 : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 13 हजार 389 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 4563 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 190 ,रायगड जिल्ह्यातील 8383 ,ठाणे जिल्ह्यातील 53 आणि पालघर जिल्ह्यातील 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.