शुक्रवार, मे 20, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जागतिक स्तनपान सप्ताहाचे महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

 फोस्टर केअर योजना नोंदणी पोर्टल; सीएसआर देणगी पोर्टलचाही शुभारंभ

Team DGIPR by Team DGIPR
ऑगस्ट 3, 2021
in वृत्त विशेष, अमरावती, जिल्हा वार्ता, नंदुरबार
Reading Time: 1 min read
0
जागतिक स्तनपान सप्ताहाचे महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. 3: बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असून नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी जन्मानंतर पहिल्या एक तासाच्या आत स्तनपान करणे आवश्यक आहे. स्तनपान सप्ताहानिमित्त याचे महत्त्व सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केले.

 

महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन, महिला व बालविकास विभागाच्या संकेतस्थळामध्ये समावेश करण्यात आलेल्या सीएसआर देणगी सुविधा तसेच फोस्टर केअर नोंदणी सुविधा पोर्टलचे उद्घाटन आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि एकात्मिक बाल संरक्षण योजनेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना माहिती व्यवस्थापनाबाबतचे (डाटा सिस्टीम मॅनेजमेंट) क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी मंत्रालयातून प्रधान सचिव श्रीमती इद्झेस कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, ‘माविम’ च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण अभियानचे संचालक संजीव जाधव, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार डॉ. राजू जोतकर आदी उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, बालकांच्या सर्वांगीण वाढीसाठी जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यात स्तनपान मिळणे आवश्यक असते. महिला व बालविकास विभागाने सर्व स्तरात प्रयत्न केल्यामुळे रेल्वे स्थानके, बस स्थानके, कामाची ठिकाणे आदी सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. परंतु, या ठिकाणी सुरक्षित वातावरण असल्याची खात्री झाल्याशिवाय महिला या सुविधेचा लाभ घेणार नाही. त्यासाठी सर्वांनाच मानसिकतेत बदल करत महिलांसाठी सुरक्षित वातावरण होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बालकांमधील कुपोषण, बालमृत्यू घटवणे तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी बालकांना वेळेत स्तनपान मिळणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागेल, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.

 

ॲड. ठाकूर म्हणाल्या, सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी ही संकल्पना महिला व बालविकासासाठी प्रभावीपणे राबविता येऊ शकते हे लक्षात घेऊन गेल्या दीड- दोन वर्षात याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.  त्याचाच एक भाग म्हणून महिला व बालविकास विभागाने सीएसआर निधी स्वीकारण्याची सुविधा वेबपोर्टलद्वारे सुरू केली आहे. ही देणगी आयकर विभागाच्या 80 जी कलमाखाली करमुक्त असणार आहे. या देणगीचा उपयोग अंगणवाड्यांचे बांधकाम व तेथील पायाभूत सुविधांचा विकास, बालकांमधील कुपोषण निर्मूलनासाठी विविध प्रकल्प, महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आदी राबवण्यासाठी होऊ शकेल, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.

 

प्रतिपालकत्त्व योजना (फोस्टर केअर) ही खऱ्या अर्थाने अनाथ, निराधार आदी बालकांना कौटुंबिक‍ वातावरण देऊ शकणारी योजना आहे. मुले ही देशाचे भविष्य आहेत असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांचे मानसिक आरोग्य, पुनर्वसन योग्य रितीने होईल याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. सर्वांनी या योजनेची चांगली प्रचार प्रसिद्धी करावी तसेच अधिकाऱ्यांनी या योजनेत भाग घेऊन बालकांचे प्रतिपालकत्त्व स्वीकारावे, असे आवाहनही यावेळी ॲड. ठाकूर यांनी केले.

यावेळी प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी पूरक पोषण आहार वितरण, अंगणवाड्यांचे बांधकाम, शौचालय, नळ पाणी पुरवठा आदी पायाभूत सुविधा, कोविड कालावधीत स्थलांतरित लाभार्थ्यांची संख्या व त्यांना पोषण आहार वितरण आणि बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण, स्थलांतरित बालकांचे, कुपोषित (सॅम आणि मॅम) बालकांचे ट्रॅकिंग, वाढीचे संनियंत्रण, नागरी अंगणवाड्यांची पुनर्रचना करणे आदी बाबींचा आढावा घेतला. अंगणवाडी बांधकामासाठी 13 व्या वित्त आयोगातील अखर्चित निधीचा उपयोग करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू आहे. अंगणवाड्यांना जलजीवन मिशनमधून नळ पाणी पुरवठा, शौचालयांचे बांधकाम याबाबत रोडमॅप करुन सादर करावा, असे निर्देश श्रीमती कुंदन यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

 

कोविड काळात कुटुंबांचे शहरातून गावांमध्ये स्थलांतर, खासगी शाळातून काढून अंगणवाड्यांद्वारा पोषण आहाराचा लाभ घेण्यास प्राधान्य देणे आदी बाबींमुळे कोविडपूर्व काळात लाभार्थ्यांची सुमारे 63 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढून 77 लाख लाभार्थ्यांवर पोहोचली आहे. या लाभार्थ्यांचे व्यवस्थित ट्रॅकिंग होणे आवश्यक असून त्यासाठी पोषण ट्रॅकिंग कार्ड देण्याचा प्रयत्न करावा, असेही श्रीमती कुंदन म्हणाल्या.

 

‘तरंग सुपोषित महाराष्ट्र’ या आयव्हीआर, चॅटबोट प्रणालीद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून बालकांच्या योग्य पोषणासंबंधीत माहिती देण्यासाठी प्रयत्न करावेत; अंगणवाडीतील बालकांच्या शिक्षणासाठी सह्याद्री वाहिनीवर वेळ निश्चित (स्लॉट बुकींग) करण्यासाठी प्रयत्न करा आदी सूचना यावेळी प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी केल्या.

 

यावेळी नंदूरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यात राबविलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सादरीकरण यावेळी केले. महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग तसेच अन्य शासकीय विभागांचे सहकार्य घेऊन बालकांचे वजन आणि उंची मोजून त्यातून कुपोषित बालकांची अचूक संख्या मोजण्याचा प्रयत्न केला. याचा उपयोग या बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यातील कुपोषण कमी करण्यासाठी व्हीसीडीसी तसेच आवश्यक तेथे शासकीय रुग्णालये यांच्याद्वारे विशेष लक्ष देणे शक्य झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणात घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

श्रीमती कुंदन यांनी नंदूरबार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राबवलेल्या या प्रकल्पाचे विशेष कौतुक करुन याच धर्तीवर संपूर्ण राज्यात 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान संयुक्त सर्वेक्षण करुन बालकांमधील कुपोषणाचा शोध घ्यावा, असे निर्देश दिले.

 

यावेळी चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी स्थलांतरितांसाठी ट्रॅकिंग व्यवस्थापन सुविधेबाबत सादरीकरण केले. त्याचा उपयोग कुपोषण निर्मूलन उपक्रम राबवण्यासाठी चांगल्या प्रकारे होणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर, पालघर, नंदूरबार आणि अमरावती जिल्ह्यात राबवण्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील काळात राज्यभरात राबवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे श्रीमती कुंदन यांनी सांगितले.

 

श्रद्धा जोशी यांनी माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्मबाबत माहिती देऊन याचा जास्तीत जास्त महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयोग करावा तसेच जिल्हा परिषदांद्वारे खरेदीसाठी महिला बचत गटांच्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

0000

 

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि.3.8.2021

Tags: स्तनपान
मागील बातमी

राजधानीत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

पुढील बातमी

आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

पुढील बातमी
आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे - उद्योगमंत्री सुभाष देसाई

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मे 2022
सो मं बु गु शु श र
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« एप्रिल    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 414
  • 9,583,756

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
      • माझी कथा
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
    • जय महाराष्ट्र
    • लढा कोरोनाशी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.