सातारा, दि. 6 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील प्रशासकीय इमारतीवरील नियोजित दुसऱ्या मजल्याच्या कामाचे भूमीपूजन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी नियोजन इमारतीचा आराखडा पाहून इमारतीमध्ये कोणत्या सुविधा आहेत याची माहिती जाणून घेतली.
00000