नवी दिल्ली, दि. ८ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रसिध्द लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार या सोमवार, ९ ऑगस्ट २०२१ रोजी ‘महाराष्ट्रातील स्त्री साहित्याचा जागर’या विषयावर ५३ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्षआणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत ९ऑगस्ट रोजी डॉ. प्रज्ञा पवार या दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.
डॉ. प्रज्ञा दया पवारयांच्या विषयी
डॉ. प्रज्ञा दया पवार या ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पवार यांनी कविता संग्रह, कथासंग्रह, ललित गद्य ,नाटक लिहिली असून विविध पुस्तकांचे संपादनही केले आहे.
‘अंतस्थ’, ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’, ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’, ‘आरपार लयीत प्राणांतिक’ आणि ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ ही त्यांची कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ आणि ‘प्रज्ञा दया पवार कथेगळू’ हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘केंद्र आणि परीघ’, ‘टेहलटिकोरी’, ‘अर्वाचीन आरण’ ही त्यांची ललित गद्य प्रसिध्द आहे. ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक त्यांनी लिहिले आहे. ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा’ या ख्यातनामन कवी नामदेव ढसाळ यांच्या निवडक कवितांचे त्यांनी सहसंपादन केले आहे. तसेच ‘विमुक्तांचे स्वातंत्र्य’ या पुस्तकाचेही सहसपांदन केले आहे.
साहित्यिक योगदानासाठी त्यांना ‘बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार’, ‘कवयित्री शांता शेळके पुरस्कार’, ‘बालकवी पुरस्कार’, ‘विशाखा पुरस्कार’, ‘शाम पनगंटी स्मृती पुरस्कार’ , ‘कविवर्य बा.सी.मर्ढेकर पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
डॉ. प्रज्ञा पवार या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या त्या सदस्य आहेत. तसेच, ‘परिवर्तनाचा वाटसरु’ या पाक्षिकाच्या संपादक म्हणूनही त्या जबाबदारी सांभाळत आहेत.
सोमवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
सोमवार, ९ ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic
००००
वृत्त वि. क्र.१६६/दिनांक ८.०८.२०२१