मुंबई, दि. 8 :- “राज्याचे माजी मंत्री मखराम पवार यांच्या निधनाने समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, प्रशासकीय अधिकारी, अशी जबाबदारी सांभाळल्यानंतर ते संसदीय राजकारणात आले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रतिनिधीत्वं केलं. वंचित बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी ते होते. त्यांचे निधन ही राज्याच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी आहे. मी मखराम पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मखराम पवार यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
०००