मुंबई, दि. 30 – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची ‘नियम पाळा, कोरोना टाळा’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्युज ऑन एअर या ॲपवर बुधवार दि. 1 सप्टेंबर आणि गुरूवार दि.2 व शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील लसीकरणाची सद्यस्थिती, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे असलेले नियोजन, डोअर टू डोअर लसीकरण, लसीकरणानंतरही घ्यावयाची काळजी, डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंट आजाराचे रूग्ण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय याविषयी राज्यातील जनतेला केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.टोपे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
०००