मुंबई, दि. 4: व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीण काम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाजबांधवांमध्ये निःस्वार्थीपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे, असे सांगून कच्छी भानुशाली समाजाने कष्टार्जित संपत्तीतून कोरोना काळात समाजासाठी केलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे, असे प्रशंसोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.
स्त्रियांसाठी कार्य करणारे जेडल फाउंडेशन व कच्छी भानुशाली सेवा समाजाच्या माध्यमातून कोरोनाकाळात उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्या 37 कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचा यावेळी कच्छी टोपी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जेडल फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया चांद्रा, कच्छी भानुशाली सेवा समाज न्यासाचे अध्यक्ष नरेश सेठीया, वल्लभदास भद्रा, डोंबिवली कच्छी भानुशाली मित्र मंडळाचे विश्वस्त – छायाचित्रकार नवीन भानुशाली, अनिल भद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताला संतांची मोठी परंपरा लाभली असून त्यांनी सांगितलेली जीवनमूल्ये भारतीय समाजाचा स्थायीभाव झाला असल्याचे सांगताना समाजाचे ऋण मान्य करणारा कच्छी भानुशाली समाज वास्तविक भाग्यशाली समाज आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी नरेश धनजी शेठिया, वल्लभदास लीलाधर भद्रा, दिनेश लक्ष्मीदास चंद्रा, नवीन भानुशाली, अरविंद चंदुलाल चंद्र, राजेश पुरुषोत्तम जोईसर, धरमशीभाई, नारायण लक्ष्मीदास मिठीया, जितेंद्र परशोत्तम गजरा, मंजी प्रेमजी गजरा, सतीश हरीश भद्रा, भरत रमेश माव, वीरेन हरिराम गजरा, अनिल शेठिया, अमित मंगलदास मांगे, अनिल भद्रा, मेहुल नारायण भानुशाली, जगदीश जोईसर, जितेंद्र शंकरलाल शेठिया, राधा परिण जोईशर, परिन नवीनचंद्र जोइशर, जितेश वालजी भानुशाली, उमेश पुरुषोत्तम भानुशाली, रावाजी नानजी दामा, विशाल दयाराम गोरी, जेठालाल नानजी भानुशाली, मंथन खिमजी गजरा, राजेश बाबूभाई भानुशाली, दर्शन चंदुलाल हेमानी, खुशालभाई गडा, अमर वल्लभदास गजरा, दर्शना दामले, मकरंद प्रभाकर प्रधान, धर्मेंद्र नवनीतलाल शाह, निवा सेजल विशाल गडा यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
00000
Governor hails the contribution of Kutchi Bhanushali community during COVID-19 pandemic; Felicitates 37 Corona Warriors
Mumbai, 4th Sept: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated 37 Corona Warriors from the Kutchi Bhanushali community at a felicitation organized by Jedal Foundation at Raj Bhavan, Mumbai on Saturday (4th Sept)
Speaking on the occasion, the Governor hailed the contribution of the Kutchi Bhanushali community during the COVID-19 pandemic.
President of the Jedal Foundation Vijaya Chandra, Secretary Darshan Hemani, photojournalist Navin Bhanushali and President of Kutchi Bhanushali Seva Samaj Trust Naresh Sethia were prominent among those present.
The Governor felicitated Naresh Dhanji Sethia, Vallabhdas Liladhar Bhadra, Dinesh Laxmidas Chandra, Navin Bhanushali, Arvind Chandulal Chandra, Rajesh Purushottam Joyser, Dharamshibhai, Narayan Lakshmidas, Jitendra Parshottam Gajra and other Corona Warriors on the occasion.
**