Sunday, March 26, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

सुंदर माझे कार्यालय अभियानाचा प्रारंभ

Team DGIPR by Team DGIPR
September 7, 2021
in नागपूर
Reading Time: 1 min read
0
कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

स्वच्छ व सुंदर कार्यालयांचा गौरव करणार; दर तीन महिन्यांनी आढावा घेणार  

नागपूर, दि. 7 : कार्यालयांची कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छ, सुंदर तसेच आल्हाददायक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. ‘सुंदर माझे कार्यालय’ या अभियानाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी  उत्साहवर्धक वातावरण निर्माण करावे, असे आदेश विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सुंदर माझे कार्यालय या अभियानाचा कार्यपद्धतीचा आढावा श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सुंदर माझे कार्यालय हे अभियान 30 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. जुने सचिवालय  इमारतीतील सर्व विभागप्रमुखांनी या अभियानामध्ये सहभागी होवून कार्यालयासह संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा. असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त हरिष भामरे, अर्थ व सांख्यिकी विभागाचे सहसंचालक कृष्णा फिरके, सार्वजनिक बांधकाम, नगर रचना, वस्त्रोद्योग, सहकार आदी  विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जुने सचिवालय ही ऐतिहासिक वास्तू असून या परिसरात असलेली सर्व कार्यालये स्वच्छ, सुंदर व नीटनेटकी असावी, तसेच येथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य, प्रेरक, उत्साहवर्धक असणे आवश्यक आहे. सुंदर माझे कार्यालय या अभियानाच्या माध्यमातून कार्यसंस्कृती वृद्धिंगत करण्याला प्राधान्य  असून   कार्यालयीन शिस्त तसेच कामाच्या वेळा पाळणे आवश्यक असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की, हे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत या अभियानातील निकषानुसार कार्यालय सुसज्ज व नेटके कसे राहील याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्यालयाची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून ही निवड मूल्यांकन पद्धतीने होणार आहे. यासाठी कार्यालय प्रमुखांनी तीन टप्प्यात काम करणे आवश्यक असून यामध्ये  कार्यालयाची स्वच्छता, कार्यपद्धती व सुलभीकरण, कर्मचारी लाभविषयक प्रकरणे व इतर बाबी, अभिलेख्यांची वर्गवारीनुसार विभागणी तसेच अनावश्यक साहित्याचे निर्लेखीकरण यावर  विशेष कार्य करण्याची आवश्यकता आहे. अभिलेख्याच्या  वर्गवारीसाठी  नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर ठेवा   

कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता तसेच डेंग्यू डासांच्या उत्पत्तीमुळे निर्माण झालेली परिस्थिती टाळण्यासाठी संपूर्ण कार्यालय स्वच्छ राहून डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करताना श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, कार्यालयातील कुलर तसेच अनावश्यक सर्व फर्निचर यांची येत्या पंधरा दिवसांत विल्हेवाट लावावी. कार्यालयातील मोकळी जागा, स्वच्छतागृहे  येथे घाण साचणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

जुने सचिालय इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, परिसरातील उपयोगात नसणारी सर्व वाहने निर्लेखित करावी तसेच कार्यालयातील अनावश्यक साहित्य संगणक, अभिलेखे यासंदर्भात योग्य नियोजन करुन कार्यवाही करावी. कार्यालयाच्या व परिसराच्या स्वच्छतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करुन  प्रत्येक कार्यालयाकडे वापरात असणाऱ्या जागेच्या स्वच्छतेसाठी शुल्क आकारणीचे नियोजन करावे, अशा सूचना बैठकीत दिल्या.

प्रारंभी उपायुक्त हरिष भामरे यांनी ‘सुंदर माझे कार्यालय’अभियानासंदर्भात माहिती देवून सर्व कार्यालयांनी अभियानामध्ये सहभाग घ्यावा, अशी माहिती यावेळी दिली. कार्यालय व परिसर स्वच्छतेबद्दल यावेळी  विभागप्रमुखांनी विविध सूचना केल्या.

Tags: विभागीय आयुक्त
मागील बातमी

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सण-उत्सव काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

पुढील बातमी

थोरांचा वारसा जपणे काळाची गरज – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

पुढील बातमी
थोरांचा वारसा जपणे काळाची गरज – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

थोरांचा वारसा जपणे काळाची गरज - विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,974
  • 12,224,450

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.