मुंबई, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात माझी शेती, माझा सात बारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा, या विषयावर ई–पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एअर या ॲपवर गुरूवार 23 आणि शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ई-पीक पाहणी हा प्रकल्प नेमका काय, ई-पीक पाहणीचे फायदे, ई-पीक पाहणीचे राज्यभर अंमलबजावणीचे टप्पे, राज्यातील शेतकऱ्यांचा या योजनेला लाभत असलेला प्रतिसाद, शेतकऱ्यांमध्ये करण्यात येत असलेली जनजागृती, आगामी विविध योजना, उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा ई-पीक पाहणीसाठी करण्यात येत असलेला वापर आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. जगताप यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.