सातारा दि.11 (जिमाका) : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस बंदोबस्ताची सातारा व कराड शहरात पाहणी केली.
पाहणी प्रसंगी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई यांनी सातारा, उंब्रज व कराड येथील चौकात जावून बंदोबस्ताची पाहणी केली. पाहणी प्रसंगी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना पोलीस विभागाला केल्या.
000000