Monday, May 29, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ आणि १६ ऑक्टोबरला महाजालीय अभिवाचन महोत्सव

Team DGIPR by Team DGIPR
October 14, 2021
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ आणि १६ ऑक्टोबरला महाजालीय अभिवाचन महोत्सव
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. 14; माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस  15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचं औचित्य साधून, वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळावे, वाचनाचा प्रचार, प्रसार व्हावा आणि अधिकाधिक लोकांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स तसेच व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट या संस्थांनी मिळून एका डिजिटल अभिवाचन सोहळ्याचे आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे.

राज्य मराठी विकास संस्थेद्वारे व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट यांच्या सहकार्याने  महाजालीय अभिवाचनाचा एक आगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. १५ आणि दि. १६ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी सायंकाळी ६:०० वा.  ते ७:१५ वा. प्रत्येकी ७५ मिनिटे असा एकूण अडीच तासांचा हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे ठरलेल्या वेळेपासून थेट प्रक्षेपण राज्य मराठी विकास संस्था, व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या यूट्यूब वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

या अभिवाचन सोहळ्यात मराठी भाषामंत्री  सुभाष देसाई, मराठी भाषाराज्यमंत्री विश्वजीत कदम, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार हेमंत टकले, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, दिनेश अडावदकर, डॉ. महेश केळुसकर, श्रीमती सीमा देशमुख, समीर दळवी, डॉ. प्रिया जामकर, डॉ. रेखा दिवेकर, श्रीमती  मीनाक्षी पाटील, अक्षय शिंपी, श्रीमती सुलभा सौमित्र, श्रीमती मधुरा वेलणकर, राजन ताम्हाणे, श्रीनिवास नार्वेकर, श्रीमती अस्मिता पांडे, श्रीमती अमृता मोडक, डॉ. गिरीश पिंपळे, श्रीमती अदिती सारंगधर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्य मराठी विकास संस्था, व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट, मिती क्रिएशन्स आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या यूट्यूब वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

महाजालीय अभिवाचन स्पर्धा

दि. 1 ऑक्टोबरपासून या स्पर्धेची सुरुवात झाली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी मराठी साहित्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या ललित लेखांचे अभिवाचन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धा ऑनलाईन असल्यामुळे स्पर्धकांनी या अभिवाचनाचे 3 ते 5 मिनिटांचा व्हिडीओ स्पर्धेसाठी पाठविले आहेत. या निमित्ताने अनेक प्रतिथयश लेखकांचे ललितलेखन वाचले गेले. काहींनी स्वतः लिहिलेल्या लेखांचे अभिवाचन केले आहे. तर काहींनी अलीकडच्या काळातील काही अप्रसिद्ध लेखकांचेही अभिवाचन केलं आहे.

या स्पर्धेसाठी स्पर्धकांचे ३ गट करण्यात आले आहेत. गट क्र. १ – ५ ते १५ वयोगटातील स्पर्धक, गट क्र. २ – १६ ते ३० वयोगटातील स्पर्धक आणि गट क्र. ३ – ३१ च्या पुढील वयोगटातील स्पर्धक.

या तीनही वयोगटात अनेक स्पर्धकांनी अतिशय उत्तम रीतीने अभिवाचन करून वाचन चळवळीला खऱ्या अर्थाने पुढे नेले आहे.

या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवलकर, पणजी आकाशवाणी केंद्राचे निवेदक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक साईश देशपांडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जयंत शेवतेकर, हे मान्यवर करत आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख रक्कम, पुस्तक आणि प्रशस्तीपत्रक अशी बक्षिसे आहेत. इतकंच नव्हे तर विजेत्या स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ आणि इतर काही निवडक स्पर्धकांच्या अभिवाचनाचे व्हिडीओ राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर, मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर, तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले जातील.

या स्पर्धेच्या निमित्ताने 11 ऑक्टोबर रोजी एक फेसबुक लाइव्ह सेशन आयोजित करण्यात आले. ज्यात अभिवाचनातील बारकावे, अभिवाचन कसे करावे, अभिवाचनाने आपली भाषा कशी समृद्ध होते या सगळ्या गोष्टींविषयी ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी तसेच अभिनेते, लेखक, चिन्मय केळकर, रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर आणि प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने या मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले. सहभागी अनेक स्पर्धकांनी अभिवाचनाच्या या ऑनलाईन कार्यशाळेत भाग घेतला आणि अभिवाचनाच्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने ही कार्यशाळा लाभदायक ठरेल असा अभिप्रायही व्यक्त केला. येत्या 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता या अभिवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर होईल. हा कार्यक्रम राज्य मराठी विकास संस्था आणि मिती ग्रुपच्या फेसबुक पेजवर आणि युट्युब चॅनलवर सादर केला जाईल. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मिती क्रिएशन्सच्या संचालिका उत्तरा मोने, अभिनेत्री कविता लाड, अशी अनेक मान्यवर मंडळी सहभागी होतील. काही निवडक उताऱ्याचे अभिवाचनसुद्धा यानिमित्ताने केले जाईल.

या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात वाचनाविषयी प्रेम वाढेल, तरुणांमध्ये चांगले वाचायची गोडी निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने वाचनाची प्रेरणा लोकांमध्ये जागवली जाईल असा विश्वास राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तसेच महाजालीय अभिवाचन स्पर्धेचा कार्यक्रम दि. १८.१०.२०२१ रोजी सायंकाळी ६:०० वा. ते ८:०० वा. प्रिमिअर स्वरूपात प्रसारीत करण्यात येईल. हे दोन्ही कार्यक्रम निर्धारीत वेळेत पूर्ण झाल्यानंतर मात्र संपूर्ण कार्यक्रम केव्हाही पाहण्यासाठी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी संपर्क ९९३०११५७५९.

0000

 

विसअ/ मराठी भाषा

Tags: महाजालीय अभिवाचन महोत्सव
मागील बातमी

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांमध्ये राबविण्यास राज्य शासनाची मंजुरी – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

पुढील बातमी

मंत्रालयात साजरा होणार वाचन प्रेरणा दिन

पुढील बातमी
दिव्यांग कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात कार्यालयीन उपस्थितीत सूट

मंत्रालयात साजरा होणार वाचन प्रेरणा दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 347
  • 12,624,953

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.