मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई यांनी दुर्मिळ होत जाणाऱ्या असंख्य देशी बियाण्यांचे जतन आणि संवर्धन केले आहे. ते करीत असताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी कशी मात केली, बीजबँकेची केलेली उभारणी आदी विषयांची माहिती श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
000000