मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास या कार्यक्रमात नगररचना विभागाचे संचालक नोरेश्वर शेंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवर शनिवार दि. १३, सोमवार दि.१५, मंगळवार दि.१६ आणि बुधवार दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नगररचना विभागाची कार्यपद्धती,प्रादेशिक योजना,विकास योजना आणि नगर रचना योजना कशा प्रकारे केल्या जातात आदी विषयांची माहिती श्री. नोरेश्वर शेंडे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.