मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास” या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एअर’ या अॅपवर गुरुवार, दि. १८ आणि शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोन स्वतंत्र संस्था आहे. या दोन्ही संस्थांचा मतदार नोंदणी संदर्भात एकमेकांशी साधण्यात येणारा समन्वय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्याच मतदारयाद्या वापरण्याचे प्रयोजन, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०, मतदानाच्या वेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी मतदारांनी घ्यावयाची खबरदारी, मतदारांना केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. कुरुंदकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
000