नवी दिल्ली,12 :महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला195कोटी54लाख30हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणाऱ्या निर्भया फंड,वनस्टॉप सेंटर,महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना निधी वितरित करण्यात आला आहे.महाराष्ट्राला या योजनांतर्गत एकूण195कोटी54लाख30हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
‘निर्भया फंड’अंतर्गत राज्याला149कोटींचा निधी
महिला सुरक्षेसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने‘निर्भया फंड’तयार करण्यात आला असून देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना याअंतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे.महाराष्ट्राला‘निर्भया फंड’अंतर्गत एकूण149कोटी40लाख6हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.याच कार्यक्रमांतर्गत राज्याच्या विधी व न्याय विभागाला31कोटी5लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
‘वनस्टॉपसेंटर’उभारण्यासाठी14कोटी
अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी देशभर‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असे सेंटर उभारण्यासाठी14कोटी46लाख54हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ संपर्क करता यावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या‘महिला हेल्पलाईनचे’सार्वत्रिकरण करण्यासाठी महाराष्ट्राला62लाख70हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
00000
रितेशभुयार/वृत्तवि.क्र.267/ दिनांक12.12.2019