मुंबई,दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’व ‘दिलखुलास’कार्यक्रमात’जैवविविधता जतन व संवर्धन’या विषयावर महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. तसेच राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून’दिलखुलास’कार्यक्रमात व’न्यूज ऑन एअर’या ॲपवरही ही मुलाखत शुक्रवार दि.13 डिसेंबर व सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होईल. संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना व उद्देश,बदलत्या तापमानाचे जैवविविधतेवर होणारे परिणाम,महाराष्ट्रातील जंगलांचे आणि प्राण्यांचे प्रकार,जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेला महाराष्ट्र,जैवविविधता बोर्डाने केलेली लक्षवेधी कामगिरी,राज्यातील फुलपाखरांचे मराठी नामकरण,महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ राबवित असलेले उपक्रम व योजना,जैवविविधतेमध्ये नोंदवहीचं महत्त्व,जैवविविधतेचा पोवाडा या विषयांची सविस्तर माहिती डॉ. विलास बर्डेकर यांनी’जय महाराष्ट्र’व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.