मुख्यमंत्र्यांनी घेतले किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळाचे दर्शन
पुणे, दि. 12 : सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन,दलित,आदिवासी,शोषित,शेतकरी,शेतमजूर,महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर’शिवकुंज’सभागृहातील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला,त्यानंतर ते बोलत होते. यावेळी सौ. रश्मी ठाकरे,आमदार आदित्य ठाकरे,आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील,माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नरच्या उपनगराध्यक्ष अलका फुलपगार,जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. या शिवजन्मभूमीत राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य रयतेला दिलासा देणारे,त्यांना न्याय देणारे कामच या ठिकाणी केले जाणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी असून सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवूया,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवजन्म स्थळी दर्शनाला जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमिनीवरील माती उचलून कपाळी लावली.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित होते. ००००
मुख्यमंत्री ने शिवनेरी किला स्थित शिव जन्मस्थान का लिया दर्शन
शिवछत्रपति के मार्ग पर आगे बढ़ेगा महाराष्ट्र
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे,दि. 12: छत्रपति शिवाजी महाराज इन्होने आम लोगों के कल्याण के लिए स्वराज्य की स्थापना की। गरीब,दलित,आदिवासी,शोषित,किसान,खेत मजदूर और महिलाओं के कल्याण की प्रेरणा छत्रपति शिवाजी महाराज इनके कार्यों के माध्यम से मिली है, जो हम उनके दिखाए गए मार्गपर ही महाराष्ट्र की कमान संभालेंगे,यह विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने किला शिवनेरी (ता. जुन्नर) में छत्रपति शिवाजी महाराज के जन्मस्थान के दर्शन कर अभिवादन किया। फिर उन्होंने “शिवकुंज” हॉल में राजमाता जीजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज की पूर्ण प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की,जिसके बाद वे बोल रहे थे। इस मौके पर सौ. रश्मि ठाकरे,विधायक आदित्य ठाकरे,विधायक अतुल बेनके,पूर्व सांसद शिवाजीराव आढळराव-पाटिल,पूर्व विधायक शरद सोनवणे,जुन्नर के उप नगराध्यक्ष अलका फुलपगार,जिला परिषद सदस्य अंकुश आमले,जिला कलेक्टर नवल किशोर राम,जिला पुलिस अधीक्षक संदीप पाटिल उपस्थित थे।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा,मुख्यमंत्री बनने के बाद मुंबई के बाहर पहली बार छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद लेने के लिए यहां आए हैं। इस शिव जन्मभूमि में राजमाता जीजाऊ और शिवछत्रपति का आशीर्वाद लेकर उनको अपेक्षित ऐसा राज्य निर्माण करने का प्रयास करेंगे,जिसकी आम लोगों को उम्मीद है। आम लोगों को मदद और उन्हें न्याय दिलाने का काम किया जाएगा। महाराष्ट्र का मुख्यमंत्री एक बड़ी जिम्मेदारी हैं यह कह कर उन्होंने अपील करते कहा के,‘आइए हम ऐसा महाराष्ट्र निर्माण करते हैं, जिसका सभी को गर्व होगा’। शिवछत्रपति के जन्मस्थान के दर्शन को लेते समय,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवछत्रपति के जन्म भूमी की पवित्र मिट्टी उठाकर अपने माथे पर लगायी।
इस अवसर पर विभिन्न संगठनों के पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित थे।
००००
CM visited Chhatrapati Shivaji Maharaja’s birthplace at Shivneri
Maharashtra can lead only following Shiv Chhatrapati’s path
– Chief Minister Uddhav Thackeray
Pune. Date.12th: Chhatrapati Shivaji Maharaj established Swaraj (self-rule) for the welfare of common people. We got the inspiration from Shiv Chhatrapati to work for deprived, tribal, exploited, farmers, farm laborers, and women. We will work for Maharashtra following his path, expressed Uddhav Thackeray today.
CM Uddhav Thackeray visited the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj at Shivenri fort (taluka- Junnar) and paid his salutation. He offered a garland to the statue of Rajmata Jijau and Chhatrapati Shivaji Maharaj in the ‘Shivkunj’ hall. He spoke at that time. Mrs. Rashmi Thackeray, MLA Aditya Thackeray, MLA Atul Benke, former MP Shivajirao Adhalrao- Patil, former MLA Sharad Sonvane, Deputy-Mayor of Junnar Alka Fulpagar, ZP member Ankush Amle, District Collector Naval Kishor Ram, District Police Superintendent Sandip Patil was present at that time.
CM Uddhav Thackeray said that he has the first time travelling out of Mumbai after becoming CM, to take blessings of Chhatrapati Shivaji Maharaj. After taking blessings of Rajmata Jijau and Shiv Chhatrapati, he also said that he would try to bring common people’s rule as expected to Shiv Chhatrapati. Justice will be given to common people and they will be assured. Being Maharashtra’s Chief Minister is a big responsibility and he appealed all to shape a Maharashtra together that everyone will be proud of.
While visiting the birthplace of Shivaji Maharaj, CM Uddhav Thackeray took the soil and put it to his forehead.
Office-bearers of various organizations and followers of Shivaji Maharaj were present at that time.
0000