राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी
मुंबई, दि. 11: राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष;तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामपंचायती वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण 16 पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय;तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 244 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 18 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेनुसार 48 मुक्त चिन्हे निश्चित करण्यात आली होती. त्यात आता 30 नोव्हेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार 142 नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता 190 झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), भारतीय जनता पार्टी (कमळ), नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ), भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी (हातोडा विळा व तारा), बहुजन समाज पक्ष (हत्ती), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात) या राष्ट्रीय पक्षांसाठी आणि शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) या महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांसाठी;तसेच जनता दल सेक्यूलर (डोक्यावर भारा घेतलेली स्त्री), समाजवादी पार्टी (सायकल), इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी), लोक जनशक्ती पार्टी (बंगला), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (दोन पाने), जनता दल युनायटेड (बाण), ऑल इंडिया मजलिस हत्तेहदूल मुस्लिमीन (पतंग) व आम आदमी पार्टी (झाडू) या इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षांसाठी संबंधित निवडणूक चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाच्या 30 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेनुसार मुक्त चिन्हांची यादी (यातील 48 क्रमांकापर्यंतची चिन्हे यापूर्वीदेखील होती):1) कपाट, 2) ब्रश, 3) डिझेल पंप, 4) इस्त्री, 5) करवत, 6) तंबू, 7) फुगा, 8) केक, 9) विजेचा खांब, 10) जग, 11) कात्री, 12) व्हायेलीन, 13) टोपली, 14) कॅमेरा, 15) काटा, 16) किटली, 17) शिवणयंत्र, 18) चालण्याची काठी, 19) बॅट, 20) मेणबत्ती, 21) कढई, 22) शटल, 23) शिटी, 24) फलंदाज, 25) छताचा पंखा, 26) गॅस सिलेंडर, 27) पत्रपेटी, 28) पाटी, 29) विजेरी (टॉर्च), 30) कोट, 31) काचेचा पेला, 32) मका, 33) स्टूल, 34) फळा, 35) नारळ, 36) हार्मोनियम, 37) नगारा, 38) टेबल, 39) पाव, 40) कंगवा, 41) हॅट, 42) अंगठी, 43) टेबल लॅम्प, 44) ब्रिफकेस, 45) कपबशी, 46) आईसक्रीम, 47) रोड रोलर 48) दूरदर्शनसंच, 49) एअर कंडिशनर, 50) सफरचंद, 51) ऑटो रिक्षा, 52) पांगुळ गाडा, 53) मण्यांचा हार, 54) पट्टा, 55) बाकडे, 56) सायकल पंप, 57) दुर्बिण, 58) बिस्किट, 59) होडी, 60) पुस्तक, 61) पेटी, 62) ब्रेड टोस्टर, 63) विटा, 64) बादली, 65) बस, 66) गणकयंत्र, 67) ढोबळी मिर्ची, 68) गालिचा, 69) कॅरम बोर्ड, 70) खटारा, 71) फुलकोबी, 72) सीसीटीव्ही कॅमेरा, 73) साखळी, 74) जाते, 75) पोळपाट लाटणे, 76) बुद्धिबळ, 77) चिमणी, 78) चिमटी/ क्लिप, 79) नारळाची बाग, 80) रंगाचा ट्रे व ब्रश, 81) संगणकाचा माऊस, 82) संगणक, 83) क्रेन, 84) घन ठोकळा, 85) हिरा, 86) डिश अँन्टेना, 87) दरवाज्याची घंटी, 88), दरवाज्याची मूठ, 89) ड्रील मशीन, 90) डंबेल्स, 91) कानातले दागिने (कर्णफुले), 92) लिफाफा, 93), एक्सटेंशन बोर्ड, 94) बासुरी, 95) फूटबॉल, 96) कारंजे, 97) नरसाळे, 98) ऊस, 99) भेट वस्तू, 100) आले, 101) चष्मा, 102) द्राक्षे, 103) हिरवी मिरची, 104) हात गाडी, 105) हेड फोन, 106) हेलिकॉप्टर, 107) हेल्मेट, 108) हॉकी, 109) वाळूचे घड्याळ, 110) पाणी गरम करण्याचे हिटर, 111) फणस, 112) चावी, 113) भेंडी, 114) लॅपटॉप, 115) कडी, 116) लाईटर, 117) ल्यूडो, 118) जेवणाचा डब्बा, 119) काडेपेटी, 120) माईक, 121) मिक्सर, 122) नेल कटर, 123) गळ्यातील टाय, 124) कढई, 125) भूईमुग, 126) पेर, 127) वाटाणे, 128) पेन ड्रॉईव्ह, 129) पेनाची नीब, 130) पेन स्टॅंड, 131) कंपास पेटी, 132) पेन्सिल शार्पनर, 133) खलबत्ता, 134) पेट्रोल पंप, 135) फोन चार्जर, 136) उशी, 137) अननस, 138) प्लास्टर थापी, 139) जेवणाची थाळी, 140) घागर, 141) पंचिंग मशीन, 142) फ्रिज, 143) रूम कुलर, 144) रबरी शिक्का, 145) सेफ्टी पीन, 146) करवत, 147) शाळेची बॅग, 148) स्कुटर, 149) बोट, 150) शटर, 151) शितार, 152) दोरी उडी, 153) साबण, 154) मोजे, 155) सोफा, 156) पाना, 157) स्टॅप्लर, 158) स्टेथोस्कोप, 159) स्टम्प, 160) सूर्यफूल, 161) झोका, 162) स्वीच बोर्ड, 163) इंजेक्शन, 164) टीव्ही रिमोट, 165) टॅक्सी, 166) चहाची गाळणी, 167) दूरध्वनी, 168) भाला फेकणारा, 169) नांगर, 170) चिमटा, 171) दातांचा ब्रश, 172) दातांची पेस्ट, 173) टॅक्टर, 174) बिगूल, 175) तुतारी, 176) टाईप रायटर, 177) टायर्स, 178) छत्री, 179) वॅक्यूम क्लिनर, 180) वॉल हूक, 181) पाकिट, 182) अक्रोड, 183) कलिंगड, 184) पाण्याची टाकी, 185) विहीर, 186) पवन चक्की, 187) खिडकी, 188) सूप, 189) कॅन आणि 190) लोकरीचा गुंडा व सुई.
०-०-०
(Jagdish More, SEC)