मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सचिन परब यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार दि. २३ डिसेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPRA
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
प्रबोधन मासिकाला यंदा १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. या मासिकाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या मासिकाचे संस्थापक संपादक स्वर्गीय प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे सामाजिक व साहित्यिक कार्य या विषयावर ही मुलाखत घेण्यात आली आहे. प्रबोधनमधील प्रबोधनकारांचे लेख, अप्रकाशित साहित्य जनतेसमोर आणण्याची संकल्पना, हुंडाबंदीसाठी केलेले प्रयत्न, प्रबोधन नियतकालिकाची शताब्दी साजरी करताना राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती मंत्री श्री. देसाई यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.