मुंबई दि. ७ : मुंबई शहर जिल्ह्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांना तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.
महिलांच्या तक्रारी अथवा अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी दु. २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांना तक्रार अर्ज दाखल करावयाचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन दोन प्रतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.