मुंबई, दि. 6 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन येथील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपासभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, माजी सदस्य तुकाराम बिडकर, राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भगत, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव सायली कांबळी आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००
Tributes paid to the Great Dr. Babasaheb Ambedkar in the Vidhan Bhavan
Mumbai, 6th: Chairman of Legislative Council Ram Raje Naik-Nimbalkar and Assembly Speaker Nana Patole offered a garland to the photo of the great Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and paid their tributes on his 63rd Mahaparinirvan Day.
Deputy-Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe, Leader of Opposition in Legislative Assembly Devendra Fadnavis, Legislative Assembly Member Mangal Prabhat Lodha, Rahul Narvekar, former Member Tukaram Bidkar, Raj Purohit, Secretary of the Legislature Rajendra Bhagat, Deputy Secretary Vilas Athawale, Secretary of the Chairman Mahendra Kaj, Hour Secretary, and other office-bearers and employees paid their tributes by offering flowers to the photo of Dr. Ambedkar.
0000