मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7. 30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वन विभागाला मिळालेला अर्थ केअर पुरस्कार, या पुरस्काराचे स्वरूप, पुरस्कारासाठीचे निकष, वृक्षलागवडीसाठी व्यापक लोकसहभाग, वृक्षलागवडीची लॅण्ड बँक कशाप्रकारे निश्चित करण्यात आली, वृक्षलागवडीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, डिजिटल प्लॅटफॉर्मवर लावलेली रोप नोंदवणे, 50 कोटी वृक्षलागवडीचे फलित आणि भविष्यातील वाटचाल कशा प्रकारची असेल आदी विषयांची माहिती श्री. खारगे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.