रामायण अध्ययन प्रेरणादायी- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
11

आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 28 : रामायण जीवनाचा आधार आहे, रामायण एकता आहे, रामायण विश्वबंधुत्वाचा संदेश देते. रामायण अध्ययन प्रेरणादायी असून त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करु शकतो, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उद्घाटन केले.

मुंबई विश्व विद्यालय आणि भागवत परिवार यांच्यातर्फे ग्रीन टेक्नोलॉजी सभागृह, मुंबई विश्वविद्यालय, कलिना येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.यावेळी भागवताचार्य रमेशभाई ओझा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, उपकुलगुरु डॉ.रवींद्र कुलकर्णी, दीपक मुकादम, जपानच्या हिन्दी भाषा अभ्यासक श्रीमती डॉ.तोमोको किकुची तसेच अन्य देशातील आणि महाविद्यालयातील हिन्दी भाषेतील तज्ज्ञ उपस्थ‍ित होते.

नानकदेव तसेच अन्य संतांनीही आपापल्या वाडमयात रामायणाचा उल्लेख केला आहे. आज रामायणाचा अंगिकार सर्व देश करत आहे. सर्वांनी उत्तम गुणांचा अंगिकार केल्यास, समाज निश्चितपणे रामराज्याकडे वाटचाल करील, असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here