अमरावती, दि. 3 : गावाच्या विकासप्रक्रियेत नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची प्राधान्याने निर्मिती करण्यात येईल. या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी शासन स्तरावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिली. गावात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या माध्यमातून नागरिकांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सर्व कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश बच्चू कडू यांनी यावेळी दिले. आज (दि.3) विविध योजनेअंतर्गत प्राप्त 43 कोटी 63 लक्ष रुपयांच्या निधीतून चांदुर बाजार तालुक्यात विविध विकास कामाचे भूमिपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शारदा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ललित बोबडे, उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे, जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता नितीन झगडे आदी उपस्थित होते.
बेलोरा येथे 85 लक्ष रुपये निधीतुन विविध कामे
बेलोरा येथे तांडावस्ती योजनेअंतर्गत मोईपूर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम, स्थानिक अहिल्याबाई होळकर नगर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषि उत्पन्न साठवण गृह गोदाम व विक्री केंद्राचे बांधकाम, मौजा बेलोरा येथे सिमेंट कॉकीट रस्ता बांधकामाचे असे एकून 85 लक्ष रुपये निधीतुन विविध कामांचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.
शिरजगाव बंड सर्कल मध्ये एकूण 27 कोटींची विकासकामे
बेलोरा,शिरजगाव बंड सर्कल मध्ये एकूण 27 कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन श्री कडू यांनी केले. चांदुर बाजार- वलगाव रस्ता,जुनी पंचायत समिती ते परसोडा फाट्याचे चौपदरीकरणाचे 13 कोटी 19 लक्ष रुपये निधीतून भूमिपूजन करण्यात आले. बेलोरा येथे युवकांसाठी उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण श्री कडू यांनी केले. युवकांनी सुदृढ व मजबूत शरीरयष्टी कमविण्यासाठी या व्यायामशाळेतील आधुनिक उपकरणांचा वापर करावा. व्यायामशाळेतील उपकरणांची वेळोवेळी योग्य ती देखभाल करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
चिंचोली काळे, वाठोडा येथे रस्ता, नाली व सभागृहाची निर्मिती
चिंचोली काळे गावात तांडावस्ती योजनेअंतर्गत प्राप्त 10 लक्ष रुपये निधीतुन सिमेंट रस्ता व नाली बांधकाम भुमिपुजन श्री कडू यांनी केले. वाठोडा येथे 18 लक्ष रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह बांधकाम करणे व हनुमान मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकामाचे भुमिपूजन यावेळी करण्यात आले. चांदुर बाजार, नानोरी, सोनोरी, घाटलाडकी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम 8 कोटीच्या निधीतून करण्यात आले. सुरळी येथे 6 कोटी 15 लक्ष रुपयांच्या निधीतुन रस्ता बळकटीकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले.
वारुळी फाटा ब्राम्हणवाडा थडी येथील घाटलाडकी रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन 22 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. परसोडा येथे तांडावस्ती योजनेअंतर्गतथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम 10 लक्ष निधीतुन करण्यात येत आहे. चिंचकुंभ येथील अडगाव विचोरी तळेगाव, विण्मोरा, खेड, सायवाडा,, गणेशपुर, चिचकुंभ रस्त्यांची सुधारणा करण्याच्या कामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.
घाटलाडकी येथे 3 कोटी 75 लक्ष रुपये निधीतुन विविध विकासकामांचे भुमिपूजन
घाटलाडकी, राजस यांचे घर ते राममंदिर पर्यंत रस्ता व बांधकामाचे लोकार्पण, कब्रस्थान, संरक्षकभिंत, ओटा व रस्ता बांधकाम करणे, शांतिनगर गवळी येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे. तांडावस्ती योजनेअंतर्गत मोईपूर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी केले. दलितवस्ती, मातंग समाज व अण्णाभाऊ साठे परिसराचे सौदर्यकरणाचे कामाचे भुमिपुजन, घाटलाडकी येथील सिमेंट कॉक्रीट रस्ता व भुमिगत गटारे बांधकाम करणे, सिमेंट कॉक्रीट जोडरस्ता बांधकामाचे, सभागृह बांधकामाचे व येथील सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे सौंदर्यीकरणासह बांधकामाचे सुमारे 3 कोटी 75 लक्ष प्राप्त निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भुमिपूजन आज श्री कडू यांनी केले.
ब्राम्हणवाडा येथे विकासकांमांचे भुमिपूजन
बाम्हणवाडा थडी येथे 61 लक्ष निधीतून मोठया पुलाचे बांधकाम, तांडावस्ती योजनेअंतर्गत 5 लक्ष निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम, नागोवा तांडा येथे 4 लक्ष रुपये निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, 90 लक्ष रुपये निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता व भुमिगत गटारे बांधकाम, 60 लक्ष रुपयांच्या निधीतुन सभागृहाचे बांधकाम, 51 लक्ष रुपयांच्या निधीतुन सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे सौंदर्यीकरणासह बांधकाम करणे, सभागृह व नाली बांधकामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.
000