लातूर, दि.4 ( जिमाका ) : उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित दिनांक 22, 23, 24 एप्रिल, 2022 या तीन दिवसाच्या कालावधीत उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील, सचिव प्रा.मनोहर पटवारी, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
000