मुंबई, दि. 6 – आपल्या सुमधुर आवाजाने कित्येक दशके संगीत विश्वाला मोहिनी घालणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शोक व्यक्त करून लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणतात, लता दिदींनी आपल्या अतुलनीय आवाजाने प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाने प्रत्येक चाहता आज नि:शब्द झाला आहे. देशवासियांच्या मनावरील त्यांचे साम्राज्य यापुढेही कायम राहील. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
०००