मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
9

मुंबई,दि.21 :राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी,त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्यातून रोजगाराच्या  संधी उपलब्ध करुन देणाऱ्या  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरामधील सुशिक्षित नवउद्योजक बेरोजगारांना वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच उद्योग व्यवसायामध्ये व्यापक प्रमाणात पूरक गुंतवणुकीसाठी राज्य शासनामार्फत नव्यानेच कार्यान्वित झालेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)सद्यस्थितीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना100टक्के ऑनलाईन कार्यप्रणालीनुसार राबविण्यात येते. इच्छुक अर्जदारांनी योजनेची माहिती तसेच ऑनलाईन अर्जासाठीmaha-cmegp.gov.inया संकेतस्थळावर भेट देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग सह संचालक पी.जी. राठोड यांनी केले आहे.

योजनेंतर्गत सेवा उद्योगासाठी कमाल रु.10.00लाखाचे व उत्पादन प्रकल्पासाठी कमाल रुपये50लाखांचे अर्थसहाय्य बँकेमार्फत दिले जाते. ज्यामध्ये शासनाचे अनुदान प्रवर्गनिहाय15ते25टक्के देय आहे. तसेच अर्जदाराची स्वगुंतवणूक5ते10टक्के भरावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

1)जन्म दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/वयाचा पुरावा

2)शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे कागदपत्रे/प्रमाणपत्रे

3)आधार कार्ड

4)जातीचे प्रमाणपत्र (एस.सी./एस.टी. प्रवर्गासाठी)

5)विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र (अपंग,माजी सैनिक)

6)स्वसाक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र (Undertaking)

7)प्रकल्प अहवाल

 अधिक माहितीसाठी संपर्क साधा-

          उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय,

          विकास सेंटर, 702, 7वा मजला,सी. गिडवाणी मार्ग,

          बसंत सिनेमागृहाजवळ,चेंबूर (पूर्व),मुंबई– 400074

          Email ID : didicmumbai@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here