रविवार, जुलै 3, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान – प्रधान सचिव आय. ए. कुंदन

Team DGIPR by Team DGIPR
फेब्रुवारी 9, 2022
in नंदुरबार, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान – प्रधान सचिव आय. ए. कुंदन
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नंदुरबार, दि.9  (जिमाका वृत्तसेवा) : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची जिल्हा प्रशासनाच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याने याचा फायदा जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण आणि कुपोषणमुक्तीसाठी निश्चितपणे होईल, असे गौरवोद्गार महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी आज मोलगी येथे केले.

प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांच्यासह एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, युनिसेफच्या आहार विषयतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर यांच्या पथकाने आज जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्रास भेट दिली, यावेळी त्यांनी महिला व बाल विकास विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांशी प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांनी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, मिनल करनवाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, उपायुक्त गोकुळ देवरे, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य मिशनचे वरिष्ठ सल्लागार डॉ.राजु जोतकर, संजीव जाधव, करण पळसकर युनिसेफचे नितीन वसईकर आदी उपस्थित होते.

श्रीमती. कुंदन पुढे म्हणाल्या की, कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे महत्वाचे आहेत. यासाठी सर्व संबंधित विभाग आपसात समन्वय ठेवून काम करीत असल्याचे नंदूरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. बालकाचा सर्वांगीण विकास करणे, महिलांना सक्षम करणे यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व यंत्रणेने सोबत बैठक घेऊन महिलांना अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे. बालकांची बाल अदाता नोंदणी वेळेवर करावी. परस्परांशी संवाद साधण्यासाठी व्हॉटॲप गुप तयार करुन संवाद साधावा. यावेळी श्रीमती कुंदन यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांच्याशी संवाद साधून पोषण ट्रॅकर, ग्राम बालविकास केंद्र, स्थलांतरीत लाभार्थी व त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, तसेच दुर्गम भागात काम करतांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या लवकर सोडविण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

बालआमराई अंगणवाडी केंद्रास भेट…

महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्यासह आलेल्या पथकाने सर्वप्रथम बालआमराई येथील अंगणवाडी केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्याशी संवाद साधला. तसेच दैनंदिन कामकाज करताना येणाऱ्या अडचणी व अंगणवाडी केंद्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते गरोदर मातेस बेबी केअर कीटचे तसेच शालेय शैक्षणिक संच वाटप  करण्यात आले. यावेळी त्यांनी गरोदर व स्तनदामातांना अमृत आहार योजनेतून मिळणारा पोषण आहार अंगणवाडी सेविका मार्गदर्शन आदिबाबत मुक्तपणे संवाद साधला यावेळी अंगणवाडी केंद्रावर श्रीमती सारिका दादर, पर्यवेक्षिका यांनी उत्कृष्ट स्तनपान पद्धतीबाबत गरोदर आणि स्तनदा माता यांच्या समोर सादरीकरण  केले. क्रॉस क्रेडल पद्धतीचा बालकाच्या पोषण विकासात होणारे फायदे श्रीमती चैताली आव्हाड व वैशाली पाटील यांनी सांगितले. यावेळी सर्व उपस्थितांनी परसबागेस भेट दिली.

काळंबा अंगणवाडी केंद्रास भेट…

महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी त्यानंतर काळंबा, ता.जि. नंदूरबार येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन लाभार्थी महिला यांच्याशी चर्चा केली. व शासनाकडून देण्यात आलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी श्रीमती कुंदन यांनी बाळाचे औक्षण करुन बालकांस भगर व रव्याची खीर दिली. तसेच सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांना वरचा आहार सुरु करुन मातेला वैविध्यपूर्ण आहार, काळजी व स्वच्छता याबाबत स्तनदा मातांशी संवाद साधला.

सेंट्रल किचनला भेट

श्रीमती.कुंदन यांनी नंदुरबार येथील एकलव्य पब्लिक स्कुल मधील सेंट्रल किचनला भेट दिली. येथून आश्रमशाळेतील मुलांना देण्यात येत असलेल्या आहाराची माहिती जाणून घेतली. आहार बनविण्याची प्रक्रिया तसेच वाटपाची प्रक्रियेचे त्यांनी कौतूक केले.

मोलगी पोषण पुनर्वसन केंद्रास भेट

श्रीमती. कुंदन यांनी आज मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्रास भैट दिली. या ठिकाणी संदर्भित केलेल्या माता व बालकांची भेट देऊन आहाराबाबत व देण्यात येणाऱ्या पोषण सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी श्रीमती. कुंदन यांच्या हस्ते पोषण पुनर्वसन केद्रात उपचार घेतल्याने ज्या बालकांच्या वजनामध्ये श्रेणीवर्धन झाले आशा बालकांच्या मातांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात कुपोषित बालकांना शोधून त्यांना संदर्भ सेवा दिलेल्या अंगणवाडी सेविका यांचेही कौतुक केले. तसेच लॉकडाऊनच्या काळात स्वत: बोट चालवून नदी पार करुन बालकांना पोषण आहार पुरविणाऱ्या रेलूताई वसावे यांचाही सत्कार केला. नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात काम करणाऱ्या सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने मोलगी येथे देवताराज भगरधान्य  खरेदी गट व राणीकांजल लोकसंचलित साधन केंद्रामार्फत चालविण्यात येत असलेल्या भगर प्रक्रीया उद्योग केंन्द्रास भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, कुपोषण निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची व इतर महत्वाच्या उपक्रमांची व विषयांची माहिती दिली.

0000

मागील बातमी

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उद्घाटन

पुढील बातमी

आता रेल्वेबोगींवर राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी

पुढील बातमी
आता रेल्वेबोगींवर राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी

आता रेल्वेबोगींवर राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जुलै 2022
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« जून    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 1,797
  • 9,789,586

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
      • माझी कथा
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
    • जय महाराष्ट्र
    • लढा कोरोनाशी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.