मुंबई, दि. 9 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि ९) विविध क्षेत्रात्रील मान्यवरांना मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार राजभवन येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मिड-डे वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला अमृता देवेंद्र फडणवीस व मिड-डेचे व्यवसाय विस्तार प्रमुख राहुल शुक्ला प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते सर एच एन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटल, एसआरसीसी बाल रुग्णालय, झायनोवा शालबी हॉस्पिटल व इतर संस्थांना यावेळी मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माजी मंत्री गणेश नाईक, अभिनेत्री पायल घोष, प्लॅनेट मराठी ओटीटीच्या सौम्या विळेकर यांसह ३० व्यक्ती व संस्थांना राज्यपालांच्या हस्ते मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आले.
Governor presents Mid Day Maharashtra Gaurav Awards
Governor Bhagat Singh Koshyari presented the Maharashtra Gaurav Awards to individual and institutional achievers from various walks of life at Raj Bhavan, Mumbai. Former Minister Ganesh Naik was presented the Maharashtra Gaurav Award for his social work.
Smt. Amruta Fadnavis and Business Head of the Mid-Day Rahul Shukla were present on the occasion.
The awards instituted by the Mid-Day Media Group were presented to Sir H. N. Reliance Foundation Hospital, SRCC Children’s Hospital, Zynova Shalby Hospital, Procare Health Advisors Pvt. Ltd., Dr. Sujeet JP Singh, Shashikant Krishna Shetty, Neeraj Modi, Anvay Kolwankar, Payal Ghosh, Soumya Vilekar and others.