नाशिक दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या हितासाठी वायनरी उद्योग वाढीस शासन प्रोत्साहन देत आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शाश्वत विकासात लोकसहभाग तितकाच आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव व येवला तालुक्यातील विविध गावांमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार,माजी जिप अध्यक्ष राधाकिसन सोनवणे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, नाटेगावचे सरपंच विकास मोरे, निमगाव मढचे सरपंच वंदना दवंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता पी.टी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील, तहसिलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्वर शेख यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक हे द्राक्ष उत्पादनाचे माहेरघर आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात असून या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत. या अडचणी शासनाने घेतलेल्या वाईन उद्योग प्रोत्साहन निर्णयाने दूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे अधिकाधिक फायदा होणार आहे,असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.
38 गाव पाणी पुरवठा योजनेमध्ये जवळपास 59 गावांचा समावेश झाल्यामुळे येवला तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेवर अधिक ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यासाठी आता धुळगाव व राजापूर साठी स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.
शासनाकडून राबविण्यात येत असलेली सर्व विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
येवल्यातील निमगाव मढ येथील या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण
दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत निमगांव मढ येथे पिण्याचे पाण्याची पाईप लाईन टाकी कामासाठी रूपये 12 लाख, एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेअंतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी रूपये 8 कोटी 50 लाख, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सामाजिक सभागृह कामासाठी रूपये 7 कोटी 50 लाख तसेच दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत समाज मंदिराचे बांधकामासाठी रूपये 15 लाख व स्मशान भुमी संरक्षण भिंत बांधकामासाठी रूपये 15 लाख या कामांचे भूमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोपरगांव तालुक्यातील नाटेगाव येथील कामांचे भुमीपूजन व लोकार्पण
विशेष दुरुस्ती योजनेंतर्गत राज्य मार्ग 2 ते देशमाने मुखेड महालखेडा निमगाव मढ ते नाटेगाव प्र.राज्य मार्ग 8, प्र.जिल्हा मार्ग कामसाठी रक्कम रु. 150 लाख या कामांचे भुमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
0000000000