मुंबई, दि. 15 : ‘आपलं मंत्रालय’च्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/ माहिती) सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे, वरिष्ठ सहायक संचालक कीर्ती पांडे आदी उपस्थित होते. श्री. चहांदे हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.
या विशेषांकामध्ये मंत्रालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या दर्जेदार लेखांची मेजवानी आहे.‘आपलं मंत्रालय’च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांच्या साहित्याचा यात समावेश करण्यात आला आहे. अंकातील कथा, कविता, लेख, अनुभव, छायाचित्र यांची सुरेख गुंफण वाचकांना खिळवून ठेवते. याशिवाय हास्यविनोद, व्यंगचित्रे, पाककृती यामुळे हा अंक अधिक वाचनीय व संग्राह्य झाला आहे.
‘आपलं मंत्रालय द्वितीय वर्धापनदिन स्पर्धेचे विजेते
‘आपलं मंत्रालय’च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या साहित्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविधांगी आणि बहुढंगी विषयांवरील लेख, कथा, अनुभव, कविता या स्पर्धेसाठी प्राप्त झाले. परीक्षणाच्या विविध टप्प्यांवर आणि कसोट्यांवर पडताळणीनंतर प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले आहेत, तर ‘पर्सन ऑफ द आपलं मंत्रालय’हा पुरस्कार किरण शार्दुल यांना जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
कथा स्पर्धा :1) सलाईन – सुधीर वेदपाठक, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, 2) टेलर – भरत लब्दे , सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग, 3) दाटुनी कंठ – मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग, 4) शकुंतला – सारिका निलेश चौधरी, सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग 5) भूक एक? (प्रश्नचिन्ह) – दिवाकर मोहिते, लिपिक टंकलेखक, शासकीय मुद्रणालय.
लेख स्पर्धा : 1) किरण शार्दूल – कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन.विभाग, 2) सारिका निलेश चौधरी – विधी व न्याय विभाग, 3) अतुल नरहरी कुलकर्णी – कक्ष अधिकारी, वित्त विभाग
छायाचित्र स्पर्धा : 1) फ्लेमिंगो – दुर्गाप्रसाद मैलावरम, अवर सचिव, गृहनिर्माण विभाग
2) काळ्या डोळ्याचा हळद्या – प्रशांत वाघ, कक्ष अधिकारी, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग 3) वरदहस्त – नंदकिशोर नीलम साटम, प्रकल्प अधिकारी, पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र 4) पक्ष्यांची छायाचित्रे – पंकज कुंभार, वन विभाग 5) कास पठार – महादेव शांताराम मगर, लिपिक टंकलेखक, गृह विभाग
अनुभव स्पर्धा : 1) मेगाब्लॉक – किरण शार्दूल, कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग 2) अविस्मरणीय – पद्मजा श्रीपाद पाठक, प्रधान सचिवांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग 3) तीन दृश्ये – चित्रा धनंजय चांचड, कक्ष अधिकारी, वित्त विभाग 4) ओली भेळ – महेश पांडुरंग पाटील, लिपिक टंकलेखक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 5) धडा – प्रियंका बापर्डेकर, सहायक कक्ष अधिकारी, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग.
कविता स्पर्धा : 1) पूर – सुरेश नाईक, अवर सचिव, मृदा व जलसंधारण विभाग 2) गहिर्या रात्री – मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग 3) पिल्लासाठी – वृषाली सचिन चवाथे, कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय 4) विनाकारण फसतो मी – संजीव केळुस्कर, उप-सचिव, सामान्य प्रशासन विभाग 5) पाऊस – शैला जंगम, सहायक कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग.
0000