मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात वैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक डॉ.ललित हारोडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार, दि. 7 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
वैध मापनशास्त्र विभागाचे कार्य, वजन मापासंदर्भात ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्याचे निराकरण कशाप्रकारे करण्यात येते, ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, बाजारातून कुठलीही पॅकींग असलेली वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी, ग्राहकांना असलेले अधिकार, मापांबाबत असलेल्या तक्रारी कोठे करायच्या आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. ललित हारोडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.