मुंबई, दि.८ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत दि. ०६ ते १४ एप्रिल, २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील महाविद्यालय संबंधित प्राचार्य व इतर कर्मचारी यांचे करिता जात पडताळणीची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २.०० ते ४.०० पर्यंत साठे महाविद्यालय, दीक्षित रोड, विलेपार्ले, मुंबई येथे होईल. तरी या कार्यशाळेस मुंबई उपनगर जिल्ह्यातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समिती मुंबई उपनगरचे अध्यक्ष रविराज फल्ले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.