मुंबई, दि.८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर कार्यालयाच्या वतीने ११ वी १२ वी (विज्ञान) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन जात वैधता (Online Validity) प्रमाणपत्र देण्यासाठी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान इंजिनिअरींग कॉलेज, प्रियदर्शनी, चुनाभट्टी, सायन, मुंबई येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यपद्धती’ याबाबत जिल्ह्यातील सर्व ११ वी, १२ वी (विज्ञान) या महाविद्यालयाच्या प्राचार्य व इतर कर्मचारी यांचेकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यशाळेस इच्छुकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.