७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात वादळी पाऊस; शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

0
10

मुंबई, दि ६ : ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखे पर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल.

वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

0000

7 से 12 अक्टूबर तक राज्य के कुछ क्षेत्रों में तेज आंधी के साथ बारिश

खेत में निकालकर रखी हुई फसल को सुरक्षित रखें किसान

मुंबई: 7 से 12 अक्टूबर के दौरान विदर्भ, मराठवाडा और मध्य-महाराष्ट्र के कुछ क्षेत्रों में दोपहर के बाद बादलनुमा हवामान के साथ आंधी तूफान के साथ बारिश का अनुमान हवामान विशेषज्ञों ने जताया है. नाशिक के साथ खान्देश और औरंगाबाद जिले में 8 तारीख तक कुछ पैमाने में बादलनुमा हवामान और तेज आंधी के साथ बारिश की संभावना है, तथा  नगर, पुणे, सांगली,  सातारा, कोल्हापुर और सोलापुर जिलों के कुछ क्षेत्रों में 12 तारीख तक मेघ गर्जना के साथ बारिश की संभावना है. लातूर, बीड, उस्मानाबाद और नांदेड जिलेसमेत शेष मराठवाड़ा में हवामान की यह स्थिति 11 तारीख तक रहेगी.  चंद्रपुर, यवतमाल, वर्धा, नागपुर, भंडारा और गोंदिया जिले के कुछ भागों में 12 तारीख तक कुछ पैमाने में बादलनुमा हवामान और मेघ गर्जना के साथ बारिश होगी. 

आंधी के साथ बारिश की तीव्रता, कालावधि और क्षेत्र अधिक न होने के कारण किसानों को घबराने की जरूरत नहीं है. इस हवामान की स्थिति के अनुसार किसानों द्वारा खेती का नियोजन करने और निकालकर रखे हुए फसलों को सुरक्षित रखने का आवाहन, कृषि विभाग की ओर से किया गया है. इस कालावधि में किसानों को दोपहर के बाद आवेवाले आंधी औऱ बिजली से खुद की सुरक्षा करने का आवाहन किया है. आंधी आने पर लोगोंको पेड़ के नीचे, खुली जगह पर, टिन के शेड के नीचे, बिजली प्रवाह के तारों तथा विद्युत ट्रांसफार्मर ने समीप न रुकने का आवाहन भी किया गया है.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here