Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कोरोना मुक्तीसाठी जिल्हावासियांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण – पालकमंत्री उदय सामंत

Team DGIPR by Team DGIPR
May 1, 2022
in सिंधुदुर्ग, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
कोरोना मुक्तीसाठी जिल्हावासियांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण – पालकमंत्री उदय सामंत
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook
  • जिल्हा लवकरच कोरोना मुक्त होईल
  • जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी सिधु-रत्न योजनेच्या माध्यमातून 300 कोटीचा निधी

सिंधुदुर्गनगरी दि.1 ( जि.मा.का) :  कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लँट यांच्या मध्ये वाढ करण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात 57 हजार 382 इतक्या व्यक्ती कोरोना बाधित झाल्या त्यापैकी 55 हजार 847 रुग्ण बरे झाले. दुर्दैवाने 1 हजार 533 रुग्णांचा मृत्यु झाला. आज केवळ 2 रुग्ण उपचाराखाली आहेत. जिल्हा वासियांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेतली असून सिंधुदुर्ग जिल्हाचा लसीकरणात राज्यातील पहिल्या पाच क्रमांकामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात लवकरच कोरोना रुग्ण संख्या शुन्यावर येवून जिल्हा कोरोना मुक्त होईल असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा वासियांच्या सहकार्यामुळे आज आपला जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे.  त्याचे सर्व श्रेय हे जिल्हा वासियांचे आहे. प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य केल्यानेच जिल्हा कोरोना मुक्तीकडे जात आहे. यामध्ये आरोग्य विभागाने कोरोना काळात केलेले काम कौतुकास पात्र आहे. तसेच जिल्हावासियांनी कोरोनाच्या संपूर्ण काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापनदिन सोहळा पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत याच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, नागरिक, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले, कोरोना महामारी सारख्या संकटावर मात करत जो महाराष्ट्र स्वाभिमानाने, कणखरपणे मार्ग काढून विकासाकडे वाटचाल करीत  आहे. त्या महाराष्ट्र राज्य  स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्वांना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम जनतेला, शुभेच्छा देतो. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराष्ट्राच्या ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करले, त्यांच्या त्यागाप्रती भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन ते पुढे म्हणाले. आज जागतिक कामगार दिनही आहे. त्यानिमित्त  आपणा सर्वांना, जागतिक कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा देतो. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमांवर चालते, त्यामुळेच आज चौफेर विकास घडत आहे. राज्याच्या जडणघडणीत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सर्व कामगार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. त्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थनाही करतो.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याला आज बरोबर 62 वर्षे पूर्ण झाली. या 62 वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्राने समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषि, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाट्य, चित्रपट, कला, क्रीडा, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, देशातीलच नव्हे तर जगातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा हा लौकिक निर्माण करण्यात, देश-विदेशात आणि समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मराठी सुपुत्रांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या सर्व सुपुत्रांचे, त्यांच्या योगदानाबद्दल मी अभिनंदन करतो.

संपूर्ण जगात कोरोना महामारीने गतवर्षात हाहाकार माजविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही या महामारीची झळ मोठ्या प्रमाणावर बसली आहे. कित्येकांनी यामध्ये आपले आप्तेष्ट, जिवाभावाची माणसे गमावली आहेत. त्या सर्व कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, सन 2022 हे साल एक चांगली बातमी घेऊन आले. आता आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त होत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे 18 बालकांनी आपले दोन्हीही पालक गमावले आहेत त्यांना राज्य शासनामार्फत अनाथ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे व अनाथ बालकांचे संयुक्त बँक खाते उघण्यात आले असून संबंधित बालकांच्या संयुक्त खात्यामध्ये 5 लाख अनुदान जमा करण्यात आले आहे. कोरोनाचा मुकाबला करता- करता जिल्ह्याच्या विकासाठीही प्राधान्य दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजनेत सन 2021 -22 करीता 170 कोटींचा आराखडा मंजुर करण्यात आला होता. हा सर्व निधी प्राप्त झाला असून तो शंभर टक्के खर्च करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यामध्ये सन 2021-22 मध्ये विविध यंत्रणेमार्फत अनुसुचित जाती उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी 14 कोटी 78 लाख नियतव्यय मंजूर होता. हा सर्व निधी 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. त्याच बरोबर अनुसूचित.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेसाठी 7 कोटी इतका निधी वितरीत करणेत आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री म्हणून मी  जिल्ह्यामध्ये 15 कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यासाठी  निधीही वितरीत करण्यात आल्याचे सांगितले.

जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 8 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या केंद्राव्दारे 20 एप्रिल 2022 अखेर 3 लाख 59 हजार 906 इतक्या थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे अशी माहिती देवून पालमंत्री उदय सामंत यांनी  जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले चिपीचे विमानतळ आता कार्यान्वित झाले असून दररोज मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई अशी विमानसेवा नियमीतपणे सुरू आहे. त्याचा फायदा जिल्ह्याच्या पर्यटनास होत असून नुकताच सिंधुदुर्ग हा जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला असल्याचे सांगितले.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने  सिंधु-रत्न योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एकूण 300 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, कुटिर उद्योग यांना चालना देऊन दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करण्यात येणार आहे. असे सांगून पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी ही सिंधुदुर्ग वासियांची मोठी मागणी होती. ही मागणी पुर्णत्वास गेली आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पुढाकाराने 966 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने दिला आहे. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 6 गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. या संवर्धन कार्यक्रमांतर्गत गड किल्ल्यांच्या इतिहासाचेही जतन केले जाणार आहे. गड किल्ले हे फक्त आपल्या इतिहासाचेच नाही तर संस्कृतीचेही प्रतिक आहेत. त्यांचे जतन करुन आपला वारसा जपण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे.

जिल्ह्यामध्ये पहिले ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलही सुरू होत आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वेळागर येथे जिल्ह्यातील पहिले फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्यात येत आहे. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व मा. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने वेळागर येथील जमीन हस्तांतरणाबाबत एमटीडीसी व ताज ग्रूप यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषि यांत्रिकिकरण योजनेतून फलोउत्पादन यांत्रिकिकरण योजनेतुन  शेतकऱ्यांना अवजार अनुदानापोटी निधी दिला असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020-21 अंतर्गत 22 हजार 51 आंबा व़ काजु बागायतदारांना 46 कोटी 62 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे.

स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे उभादांडा- वेंगुर्ला येथे उभारण्यात येणारे स्मारक हे भव्यदिव्य करण्यावर भर देण्यात येणार असून या स्मारकासाठी 1 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारणीसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कुडाळ येथे उभारण्यात येत असलेले स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या स्मारकासाठी उभादांडा – वेंगुर्ला येथे जागा निश्चित करून, एमटीडीसीची जागा स्मारकासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. हेही स्मारक येत्या काळात पूर्णत्वास येईल.त्याच बरोबर बॅ. नाथ पै यांचे स्मारक म्हणून वेंगुर्ला येथे लवकरच कम्युनिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याचे भुमिपुजन आजच होणार आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापनदिन सोहळा साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे. आज भारताने जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात प्रगतीची गरूडझेप घेतली आहे. आजच्या दिवशी आपल्या भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे तसेच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आयुष्य वेचलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे मी माझे कर्तव्य समजतो असे सांगून पालकमंत्री उदय सामंत यांनी  महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व सिंधुदुर्गवासियांना शुभेच्छा दिल्या.

या समारंभ सोहळ्या प्रसंगी पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11 अधिकारी व कर्मचारी यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. यामध्ये  सहायक पोलीस फौजदार विनायक पवार,  पोलीस हवालदार सुनिलदत्त सुर्वे, प्रकाश गवस, मनोज राऊत, प्रितम कदम, मुकुंद सावंत, अनिल धुरी, अनुपकुमार खंडे, तर पोलीस नाईक किरण देसाई, योगेश सातोसे, पोलीस शिपाई संदिप राठोड यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या पथदर्शी कार्यक्रमांतर्गत शाळा महाविद्यालयातील मुली आणि महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी महिला हेल्पलाईन नंबर 1091, बाल हेल्पलाईन नंबर 1098 व डायल  112 क्रमांकावर संपर्क साधल्यास तातडीने पोलीस मदत मिळणार आहे.

संचलन पथकामध्ये सहा पथकाचा समावेश होता. यामध्ये प्लाटून क्र. 1 पोलीस पुरुष अमंलदार, प्लाटून क्र. 2 पुरुष पोलीस अंमलदार, प्लाटून क्र. 3 महिला पोलीस अमंलदार, प्लाटून क्र. 4 पुरुष होमगार्ड, प्लाटून क्र. 5 महिला होमगार्ड, प्लाटून क्र. 6 श्वानपथक यांचा समावेश होता. त्याचबरोबर दलाचे वज्रवाहन, अग्निशामन दल व 118 रुग्णवाहिकेचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री सामंत यांनी केले.

00000

मागील बातमी

शासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हाच विकासाचा अजेंडा : पालकमंत्री

पुढील बातमी

विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

पुढील बातमी
विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,682
  • 12,286,073

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.